प्रदुषणमुक्तीच्या सुरूंगावर साखरेचा उतारा

0

फटाके खरेदी नंतर 28 रुपये दराने 5 किलो साखर

अहमदनगर (प्रतिनिधी) – शासनाच्या प्रदुषणमुक्त दिवाळी उपक्रमाला सुरूंग लावणारे एसपी रंजनकुमार शर्मा यांनी फटाके खरेदी नंतर 28 प्रति किलो या दराने पाच किलो साखरेचा उतारा काढला आहे.
पोलिसांना फटाके खरेदीची सक्ती करणारे एसपी शर्मा यांनी आज अशी कोणतीही सक्ती नसल्याचे स्पष्टीकरण ‘नगर टाइम्स’ला दिले आहे. जे पोलीस एक हजार रुपयांचे फटाके खरेदी करतील त्यांना पाच किलो साखर 28 रु भावाने दिली जाईल असे त्यांनी सांगितले.
पोलिसांना फटाके खरेदीची सक्ती अशा आशयाचे वृत्त नगर टाइम्सने मंगळवारच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर एसपी शर्मा यांनी बुधवारी हे स्पष्टीकरण दिले आहे.

LEAVE A REPLY

*