Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

काँग्रेसच्या ‘हाता’तून बसपाचा ‘हत्ती’ निसटला

Share

नवी दिल्‍ली : आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. लोकसभेपूर्वी होणार्‍या काही राज्यांच्या निवडणुका त्यासाठी तालिम मानल्या जात आहेत. त्यासाठी काँग्रेसने आपल्या नेतृत्‍वाखाली विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्‍न चालवला. मात्र, त्याला बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी जोरदार झटका दिला आहे. शेवटपर्यंत प्रयत्‍न करूनही हत्ती हातालाच न लागल्याने काँग्रेसच्या प्रयत्‍नांवर पाणी पडल्याचे मानले जात आहे.

राहुल गांधींनी अखेरच्या क्षणापर्यंत बसपासोबत आघाडीसाठी प्रयत्न केले. बसपाला सोबत घेण्यासाठी त्यांनी पक्षाच्या मध्य प्रदेशमधील कार्यकारिणीचीही मनधरणी केली होती. बुधवारी अखेरच्या क्षणी मध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांना फोन करून आघाडीसाठी शेवटचा प्रयत्न करण्यास सांगितले होते. त्यानंतर कमलनाथ आणि बसपाचे महासचिव सतीशचंद्र मिश्रा यांच्यात बैठक झाली. मात्र या चर्चेचा निष्कर्ष समोर येण्याआधीच बसपाप्रमुख मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडी न करण्याची घोषणा केली. काँग्रेससोबत आघाडी न करण्याची घोषणा करतानाच मायावती यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केल्याने दोन्ही पक्षांमधील वातावरण अधिकच गढुळ झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!