राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हं रद्द करा

0

अण्णांची मागणी; मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे कोणी दिलेच नाहीत

नवी दिल्ली – देशातील कोणतीही निवडणूक लढताना राजकीय पक्षांना राजकीय चिन्हांची गरज नाही, पक्षाच्या नावावर अनेक भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक निवडून येत आहेत, त्यामुळे ही चिन्हंच रद्द करण्यात यावीत अशा प्रकारची मागणी ज्येष्ठा सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केली आहे.
लोकपाल कायदा मंजूर व्हावा आणि त्याची अंमल बजावणी करण्यासाठी अण्णांनी दिल्ली येथे आंदोलन केले होते. मात्र, त्यानंतर आश्‍वासन देवूनही मोदी सरकारने त्याची अंमबजावणी न केल्याने पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याचा इशारा देतानाच राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हं रद्द करावीत यासाठी निवडणूक आयोगाला आपण अनेकदा पत्रं लिहिली असून भविष्यात कोर्टाची दारंही ठोठावू, असा इशाराच अण्णांनी दिला आहे. त्यामुळे अण्णांच्या इशार्‍यानंतर राज्य तसेच केंद्र सरकार कोणती पाऊले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घटनेच्या कलम 84 मध्ये निवडणुकीसंदर्भातले नियम दिले आहेत, त्यात कुठेही चिन्हाचा उल्लेख नाही. त्यामुळे चिन्हांची ही पद्धतच घटनाबाह्य असल्याचा अण्णांचा दावा आहे. चिन्हांच्या नावाखाली लोकांचे समूह निर्माण झाले, त्यातूनच भ्रष्टाचार-गुंडगिरी वाढली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच राजकीय पक्षांसाठी चिन्ह ही ओळख बनलेली असताना चिन्हंच गायब झाली तर या निवडणूक व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची अनागोंदी येणार नाही, उलट देश चांगलाच चालेल. कारण त्यामुळे पक्ष ही व्यवस्थाच राहणार नाही असे अण्णांची स्पष्ट केले. ही लढाई प्रदीर्घ असून त्यासाठी बराच संघर्ष करावा लागेल, असंही अण्णांनी म्हटलं आहे. यासंदर्भात अण्णा लवकरच कोर्टातही याचिका दाखल करायच्या तयारीत आहेत.

   मोदी सरकारचे ठोस पाऊल नाही!   –   मोदी सरकारला तीन वर्षे दिली. मात्र, या तीन वर्षांत केंद्र तसेच राज्य सरकारने कोणत्याचं प्रकारचं ठोस पाऊल उचलंले नाही. आपण स्तब्ध राहिलो. मात्र, आता योग्य निर्णय न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया गतीमान होवून त्यात बदल होणे अपेक्षीत आहे. आपण आंदोलन केल्यानंतर काँग्रेसचं सरकार गेलं, अण्णांच्या आंदोलनामागे संघ असतो अशी चर्चा असते असे म्हटले जाते मात्र, त्यात कोणतेही तथ्य नाही. आजपर्यंत मी जी आंदोलनं केली आहेत, ती सगळ्या पक्षांच्या विरोधातली आहेत. एक आंदोलनं एखाद्या विरोधात केलं की विरोधी माझ्या इर्द गर्द फिरत असतात हे नक्की. त्यामुळे काहींना तसं वाटत असावं, असे अण्णांनी म्हटले आहे.

कृती शुन्य सरकार! –  भ्रष्टाचारविरोधी लढाई लढताना समोर कुठला पक्ष आहे हे कधी पाहिलं नाही. महाराष्ट्रात गेल्या काही काळात भाजपा तसेच अन्य अनेक मंत्र्यांची नावं समोर आली आहेत. परंतु कुणीही आपल्याचा अद्यापपर्यंत त्याबाबत पुरावे दिलेले नाहीत. हे सरकार शेतकरी या विषयावर काही बोलायलाच तयार नाही. त्यांना उद्योगपतींबद्दल बोलायला वेळ आहे. सरकार उत्पन्न दुप्पट करायचं म्हणतंय, पण कृती तर अजिबात दिसत नाही, अशा शब्दांत अण्णांनी भाजपा सरकारवर नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*