Friday, April 26, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीस यांचा बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला बेड्या

देवेंद्र फडणवीस यांचा बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला बेड्या

पुणे (प्रतिनिधि) –

विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि बदनामी करणारा व्हिडिओ तयार

- Advertisement -

करून तो सोशल मिडियावर व्हायरल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड येथील युवराज दाखले याला पोलिसांनी अटक केली आहे. या आक्षेपार्ह आणि बदनामीकारक व्हिडिओ प्रकरणी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सदस्या कोमल शिंदे यांनी तक्रार दिली होती. आता त्याच्यावर थेट तडीपारीची कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली माहिती दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या युवराज दाखले याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळाचा उल्लेख करत आक्षेपार्ह आरोप केले होते. ‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीला खोटं आश्वासन देऊन त्याच्यासोबत समलैंगिक संबंध ठेवले होते’, असा वादग्रस्त आरोप युवराज दाखलेनं केला होता. यावरून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन देत संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सभागृहात सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी आरोपी युवराज दाखले याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या