वरुण सरदेसाईंची युवासेनेतून हकालपट्टी; शिंदे गटाचा ‘जोर का झटका’

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

युवासेनेचे वरुण सरदेसाईंची (Yuvasena Varun Sardesai) युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी (expulsion) करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाने शिवसेनेला मोठा धक्का दिल्याने पुन्हा एकदा शिंदे गट सेनेत वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. वरुण सरदेसाई यांच्या हकालपट्टीनंतर शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे…

शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील पदाधिकारी तसेच उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने शिवसैनिक शिंद गटात सहभागी झाले आहेत.

दुसरीकडे शिंदे गट आमिष आणि दबाव टाकून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गटात समील होण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. आमदारांपाठोपाठ पक्षाचे खासदारही एकनाथ शिंदे गटात सामील होऊ लागल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष वाचविण्यासाठी सरसावले आहेत.

आज सायंकाळी सर्व जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांशी ते साधणार ऑनलाईन संवाद साधणार आहेत. लोकप्रतिनिधी गेले तरी संघटनात्मक पातळीवर मात्र पक्ष मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आता प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे बैठकांचा सपाटा लावला आहे. आज ते पुन्हा एकदा शिवसेना जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीनंतर जिल्हापातळीवर काय बदल होतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *