Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्या'असंच बोलत राहिल्या तर तुमचा दाभोळकर करु'; आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे...

‘असंच बोलत राहिल्या तर तुमचा दाभोळकर करु’; आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई । Mumbai

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांच्या सुरक्षा वाढवली आहे. ‘असंच बोलत राहिलात तर दाभोळकर करू’, अशी धमकी यशोमती ठाकूर यांना देण्यात आली आहे. संभाजी भिडेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांनी आक्रमक झाल्या होत्या. तसेच यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीनंतर त्यांना ही धमकी आली आहे.

- Advertisement -

संभाजी भिडे पुन्हा बरळले! महात्मा फुले, साईबाबांवर खालच्या भाषेत टीका

कैलास सुर्यवंशी असे टि्वटर हॅडल असलेल्या व्यक्तीने यशोमती ठाकूर यांना धमकी दिली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा संदर्भ त्याने यात दिला आहे. असेच बोलत असाल तर दाभोळकर करू. दाभोळकर असाच ओरडत होता एक दिवस टराटरा फाडून जन्नत मध्ये पाठवला. असे म्हणत यशोमती ठाकूर यांना धमकी देण्यात आली आहे. या धमकी प्रकणावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, मला मारायचं असेल तर मारा पण संभाजी भिडे यांच्या वक्तव्याला मी विरोध करत राहणार. तुम्हाला काय करायचंय ते करा. पण माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला गृहखातं जबाबदार असेल.

Train Firing : जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये जवानाने चौघांवर गोळ्या का झाडल्या? कोण आहे आरोपी? नेमकं काय घडलं? वाचा…

- Advertisment -

ताज्या बातम्या