Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासदाभाऊ खोतांना केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा

सदाभाऊ खोतांना केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा

मुंबई । Mumbai

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.

- Advertisement -

गृह मंत्रालयाने यासंदर्भात मुंबई पोलीस आणि संबंधित सुरक्षा दलांना यासंदर्भातील आदेशाचे पत्र पाठवले आहे. त्यानुसार सदा भाऊ खोतांना आजपासून (रविवार) वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये सदाभाऊ खोत यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. आढावा समितीची पुढील बैठक होईपर्यंत सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा लागू असेल, असे या पत्रात म्हटले आहे.

Y दर्जाची सुरक्षा नेमकी काय आहे?

देशातील सुरक्षा यंत्रणेच्या अनेक श्रेणी आहेत. प्रत्येक धोके लक्षात घेऊन त्यादृष्टीनेच सरकार आणि पोलिसांकडून सुरक्षा विविध क्षेत्रांतील नेते किंवा व्यक्तींना पुरवली जाते.

एखाद्याला कोणत्या प्रकारची सुरक्षा पुरविली जावी यासंदर्भात गुप्तचर विभागाच्या अहवालाच्या आधारे त्याचे मूल्यांकन केले जाते. देशात सुरक्षेची यंत्रणा चार टप्प्यात विभागली गेली आहे. ज्यामध्ये झेड प्लस ही सुरक्षा सर्वात वरची समजली जाते. त्यानंतर झेड, व्हाय आणि एक्स या सुरक्षा व्यवस्था आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या