Saturday, April 27, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांशी न बोलण्याची पद्धत चुकीची

मुख्यमंत्र्यांशी न बोलण्याची पद्धत चुकीची

मुंबई । प्रतिनिधी

जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित असताना त्यांच्याशी चर्चा न करता थेट जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची पद्धत चुकीची आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

- Advertisement -

मोदी यांनी काल, गुरुवारी कोरोना संदर्भात देशातील काही निवडक जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेवेळी त्या त्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र, मोदींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद न साधता जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावर मलिक यांनी नाराजी व्यक्त केली.

संघराज्य व्यवस्थेत पंतप्रधानांनी राज्याच्या प्रमुखाशी चर्चा केली पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांशी नाही. यातून आपण काही करत आहोत, असा संदेश पंतप्रधानांना द्यायचा आहे का? असा सवाल करत मलिक यांनी तुम्ही काहीही करा परंतु त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा, असा सल्ला दिला.

राज्याच्या कारभाराची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. मुख्यमंत्री हे त्याचे असतात. त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांनी त्यांच्याशी थेट चर्चा केली पाहिजे होती, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या