मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणार

नव्या कंत्राटदाराची नियुक्ती - सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबई गोवा महामार्गाचे काम Work of Mumbai-Goa Highway गेल्या बारा वर्षांपासून रखडले आहे दोन कंत्राटदारांमुळे कामाला वेळ लागला. पण आता नवीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे Public Works Minister Eknath Shinde यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.

अमरावती जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाच्या संदर्भात बळवंत वानखडे आणि अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या विषयावरील चर्चेत भाग घेताना शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले. मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या बारा वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावर अपघात होत आहेत. इंदापूर ते रत्नागिरीच्या हद्दीपर्यंतचा रस्ता अतिशय खराब आहे. हा महामार्ग कधी तरी पूर्ण होईल का, अशी विचारणा जाधव यांनी केली.

या चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई- सिंधुदुर्ग मार्ग बांधण्यात येणार आहे. त्याच्या डीपीआरचे काम सुरु आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला दोन कंत्राटदारांमुळे विलंब झाला. या कंत्राटदारांना बँकेचे कर्ज देण्यापर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मदत केली. आताही गरज पडल्यास आपण नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करू. मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी रस्ते चांगले आहेत. पण पनवेल ते इंदापूरपर्यंतचे काम खराब आहे. पण आता नवीन कंत्राटदार नियुक्त केला आहे. मुंबई गोवा महामार्ग हा जिव्हाळयाचा विषय आहे. हा महामार्ग खराब असल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणा-या वाहनांना आपण टोलमाफीही देतो.

बीओटी तत्वावरील काम संथगतीने

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या संदर्भात प्रशांत ठाकूर, संजय पोतनीस, भास्कर जाधव, सुनील राऊत, अजय चौधऱी आणि अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लेखी उत्तरात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवरी पनवेल- इंदापूर या ८४ किमी लांबीच्या चौपरीकरणाचे काम केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरु असल्याची माहिती दिली आहे. या रस्त्याचे काम बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हाती घेण्यात आले असून ते संथगतीने सुरु असल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.