धुळे : महिला, तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

धुळे : महिला, तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

धुळे शहरातील महिला, युवक, दलित समाजातील सामाजिक कार्यकर्ते आदींनी धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आयोजित प्रवेश सोहळ्यामध्ये हमाल मापाडी महिला कामगार संघटनेच्या अध्यक्षा गायत्री साळवे, उपध्यक्षा पदमा चव्हाण, पुष्पा व्होटे, कमलबाई मदने, कमलबाई निकम यांच्यासह अनेक महिलांनी पक्षप्रवेश प्रवेश केला.

तसेच सामाजिक न्याय विभागामध्ये विशाल केदार, सोनू घारु, अनिकेत हजारे, मुकेश तायडे यांच्यासह दलित समाजातील असंख्य सामाजिक कार्यकर्ते यांनीही प्रवेश केला. मयुर देवरे, झाकीर शेख यांचाही प्रवेश करणार्‍यांमध्ये समावेश आहे.

यावेळी श्री.भोसले म्हणाले की, शहरातील सर्व जाती, धर्मातील, क्षेत्रातील, पंथातील महिला, तरुण यांना एकत्र आणून संघटन वाढवू आणि शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पुन्हा एकदा निर्माण करु, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाठ, युवकचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, महिला अध्यक्ष सरोजिनी कदम, युवती अध्यक्ष हिमानी वाघ, वाल्मीक मराठे, संजविनी गांगूर्डे, तरुणा पाटील, राजू चौधरी, राजन शिरसाठ, भोला सैंदाणे, दिपक देवरे, श्रृतिक पोळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com