ठाकरे गटातील महिलेला शिंदे गटाच्या महिलांकडून मारहाण, CCTV Footage आले समोर

ठाकरे गटातील महिलेला शिंदे गटाच्या महिलांकडून मारहाण, CCTV Footage आले समोर

ठाणे | Thane

शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये अजूनही धुसपूस सुरु आहे. ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर येत आहे...

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना सोमवारी सायंकाळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. ठाण्यातील कासारवडवली येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रोशनी शिंदे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की, मी टाटा मोटर्स कासारवडवली येथे माझ्या ऑफिसमध्ये कामावर रुजू असताना कामावर सुटण्याची वेळ झाली असताना सायंकाळी शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर १५ महिला अशा एकत्रित ऑफिसमध्ये घुसून मला शिवीगाळ करून मारहाण केली.

ठाकरे गटातील महिलेला शिंदे गटाच्या महिलांकडून मारहाण, CCTV Footage आले समोर
Twitter च्या लोगोत बदल! चिमणी उडाली, आता दिसतोय Doge... Elon Musk च्या निर्णयामुळे युजर्स हैराण

मी शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची युवती सेना म्हणून काम करत आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून मी माझे मत त्या ठिकाणी मांडले होते. परंतु दत्ताराम गवस यांनी माझ्यावर वैयक्तिक कमेंट केली. त्यावेळी मी त्यांना प्रत्युत्तर दिले. जे मी अर्जासोबत जोडलेलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

ठाकरे गटातील महिलेला शिंदे गटाच्या महिलांकडून मारहाण, CCTV Footage आले समोर
खासदार संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले...

मी माझ्या कमेंटमध्ये कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पत्नीचा उल्लेख केला नसतानाही मला वारंवार धमकीचे कॉल येऊ लागले होते. माझी चूक नसताना आणि मला भांडण वाढवायचे नव्हते म्हणून भी सॉरीची पोस्ट केली होती. तरीही माझ्या ऑफिसमध्ये काही महिला एकत्र घुसून माझ्यावर जीवघेणा हल्ला केला, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com