पोटनिवडणूक पुढे ढकलण्यासंदर्भात आयोगाला पत्र लिहिणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती
पोटनिवडणूक पुढे ढकलण्यासंदर्भात आयोगाला पत्र लिहिणार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये इतर मागासवर्ग समाजाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण( OBC Political Reservation ) रद्द झाल्यानंतर राज्यातील पाच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये जाहीर झालेल्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात म्हणून राज्याचे मुख्य सचिव राज्य निवडणूक आयुक्तांना ( State Election Commissioner ) पत्र लिहिणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार( Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

राज्यातील करोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली नसल्याने या निवडणूका पुढे ढकलण्यात याव्यात अशी याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाता दाखल केली होती.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव पोटनिवडणूक पुढे ढकलण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com