Friday, May 10, 2024
Homeराजकीयभाजप-मनसे युती होणार?

भाजप-मनसे युती होणार?

पुणे (प्रतिनिधि) / Pune – आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) नाशिक येथे पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटं बोलत उभे होते. या’ दोन्ही नेत्यांच्या ‘स्टँडिंग मीटिंग’नंतर दोन्ही पक्षाच्या युतीबाबाबत चर्चा सुरू असतानाच या भेटीत पाटील यांनी परप्रांतीयाच्या विरोधातील ठाकरे यांनी त्यांची भूमिका बदलली पाहिजे, असे सांगितले होते.

राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेवर आक्षेप असल्यामुळे भाजप मनसेशी युती करु शकत नाही, असेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांच्या अलीकडच्या भाषणाच्या काही क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी परप्रांतीयाबद्दलची त्यांची भूमिका नक्की काय हे त्यांनी काही हिंदी न्यूज चॅनेलाला दिलेल्या मुलाखती ऐकल्यानंतर लक्षात येईल, असे चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते.परप्रांतीयांविषयी माझी नेमकी काय भूमिका आहे, याच्या क्लिप्स तुम्हाला मी पाठवतो, असेही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. त्यानुसार मनसेकडून या क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे आगामी पालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.

राज ठाकरे यांनी या क्लिप्स पाठवल्याची माहिती स्वतः पाटील यांनी दिली आहे. नाशिकमध्ये (nashik) झालेल्या भेटीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची परप्रांतीयाबाबतची भूमिका नक्की काय आहे. यांच्या मुलाखतीच्या व्हिडीओ क्लिप पाठवतो ,असे सांगितले होते. ठाकरे यांनी मला त्या क्लिप पाठवल्या आहेत. त्या मी सर्व ऐकणार आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

त्यामुळे भाजप मनसे यांच्या युतीसाठी महत्वाचे पाऊल मानले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. पुढील सहा महिन्यात मुंबईसह १५ महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत.हे तिन्हीही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन लढल्यास त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची भीती आहे.तर मनसेची परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे मनसेसाठीही हा युतीचा पर्याय सोयीचा असणार आहे.

राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका भाजपसाठी आणखी जमेची बाजू ठरणार आहे. पण, केवळ परप्रातियांबद्दलची मनसेची भूमिका भाजपसाठी अडचणीची आहे. मनसेनेही आता त्यांची भूमिका मवाळ केल्याचे चित्र आहे.परंतु, हा विरोध नक्की काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न मनसेकडून होत आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांच्या मुलाखतीच्या क्लिप्स चंद्रकांत पाटील यांना पाठविण्यात आल्या आहेत. मुलाखतीच्या पाठविलेल्या व्हिडीओ क्लिप म्हणजेच युतीसाठी स्वतः हात पुढे करणे असाच त्याचा किमान आतातरी अर्थ म्हणावा लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या