Friday, April 26, 2024
Homeराजकीय'ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, त्यांच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?'

‘ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, त्यांच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?’

मुंबई | Mumbai

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवरुन सरकारवर टीका केली होती. तसेच, मुंबई पोलीस दबावात काम करत असल्याचाही आरोप पांडे यांनी केला होता. मात्र, आता बिहार विधानसभा निवडणुकांच्या मैदानात नितीश कुमार यांच्या जदयु पक्षाकडून ते निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे, भापजप्रणित आघाडीचे ते उमेदवार असणार आहेत. यावरूनच “महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?”, असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. गृहमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

तसेच एम्सच्या अहवालानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांवर हल्ला चढवला आहे. ‘भाजपनं हे प्रकरण हायजॅक केलं असून त्याला वेगळं वळण दिलं आहे,’ असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.

“एम्सच्या अहलावानंतर महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं केला होता. तरीही, भाजपनं या प्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांनी जनता माफ करणार नाही.” अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

“सुशांतप्रकरणाचं निमित्त पुढे करून एका राजकीय पक्षानं महाराष्ट्राला बदनाम करण्याच षडयंत्र रचलं आहे. बाहेरच्या राज्यातील कठपुतलींनाही आपल्या तालावर नाचवण्याचं काम या पक्षानं केलं. एम्स आणि कूपर रुग्णालयानं आपला अहवाल दिलाय. या अहवालातून सुशांतची हत्या झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचबरोबर, सुशांतच्या शरीरात विष सापडलं नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं सीबीआयनंही आपला अहवाल द्यावा,” अशी विनंती अनिल देशमुख यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या