भाजपचे अपयश मांडण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज : नाना पटोले

भाजपचे अपयश मांडण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज : नाना पटोले

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

केंद्रातील मोदी सरकारचे (Modi Government) अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज तयार करणार असल्याची माहिती काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली...

आज टिळक भवन येथे पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना पटोले यांनी केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली.

भाजपचे (BJP) सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, स्वयंपाकाचा गॅस, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बेरोजगारीची प्रचंड वाढली आहे.

शेतमालाला भाव नाही, अर्थव्यवस्था उद्धवस्थ झाली आहे. मोदी सरकारच्या काळात देश अधोगतीला लागला आहे असे असताना सरकार मात्र हिंदू-मुस्लीम याच मुद्द्यावर वाद निर्माण करुन मुख्य समस्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत (Election) पक्षाची कामगिरी चांगली व्हावी, यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. राज्य सरकारने (State Government) केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचवा. सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाचा विचार रुजवण्याचे काम करा, असे आवाहनदेखील नाना पटोले यांनी केले.

बैठकीत काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी, पदाधिकाऱ्यांची प्रशिक्षण शिबिरे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्षाची तयारी, महागाई विरोधातील जनजागरण अभियान याचाही आढावा घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com