Monday, April 29, 2024
Homeराजकीयमुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेणार?, पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेणार?, पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुंबई | Mumbai

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मुंबईतल्या व्यवसाय आणि बॉलिवुड क्षेत्रातील दिग्गजांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावरून योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगलं होतं. अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्ही मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेणार नसून नव्याने उभारणार आहोत, असा खुलासा केला आहे.

- Advertisement -

योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत पत्रकार परिषद उत्तर प्रदेशच्या विकास कामाबद्दल आणि फिल्मसिटीबद्दल खुलासा केला आहे. उत्तर प्रदेशसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. उत्तर प्रदेशमध्ये अनेक उद्योग धंदे सुरू करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्मसिटी उभारणार आहे. नोएडा परिसरात भव्य फिल्मसिटी उभारणार आहोत. कुणी कुणाची काही वस्तू घेऊन जात नाही आहे. आम्ही काही कुणाची पर्स उचलून घेऊन जात नाही. ही एक खुली प्रतिस्पर्धा आहे. जो चांगली सुविधा देईल, सुरक्षा देईल, सामाजिक सुरक्षा देणार आणि कुणासोबतही भेदभाव होणार नाही, असं वातावरण देईल, अशी ही स्पर्धा आहे. एक भारत आणि श्रेष्ठ भारतासाठी वातावरण देण्याची गरज आहे असंही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील फिल्मसिटी ही मुंबईत काम करेल, उत्तर प्रदेशमध्ये नव्या फिल्मसिटीचे उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे या श्रेत्रातील दिग्गज लोकांशी चर्चा केली. त्यांच्या अनुभवातून चांगली फिल्मसिटी निर्माण होईल. फक्त एका क्षेत्रासाठी नसून संपूर्ण जगात एक मॉडेल निर्माण होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्ही कुणाच्याही क्षेत्राला बांधा पोहोचवत नाही, कोणत्याही राज्याचा विकास रोखत नाही. आम्ही भारताची आर्थिक स्थिती कशी उभारता येईल, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जे कार्य सुरू केले आहे. त्यात उत्तर प्रदेश आपल्याकडून योगदान देत आहे, असंही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या