Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापरराज्यात गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करणार -उदय सामंत

परराज्यात गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करणार -उदय सामंत

मुंबई | प्रतिनिधी

गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योग (Industries moved out of Maharashtra)कोणत्या कारणामुळे गेले याची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत (Retired Judge) चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant)यांनी बुधवारी दिली.

- Advertisement -

निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीत तीन सदस्यांचा समावेश असेल आणि येत्या २ महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच जे प्रकल्प बाहेर गेले आहेत त्याबाबत येत्या एक महिन्यात श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी घोषित केले.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेउन वेदांत-फॉक्सकॉनसह इतर प्रकल्प राज्याबाहेर जायला महाविकास आघाडी सरकार जबाबदार नसून शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्राचे वातावरण उद्योगांसाठी अनुकूल आहे. राजकीय आरोपामुळे राज्यातील वातावरण दूषित होऊ शकते. मात्र. येत्या काळात महाराष्ट्रात ५० हजार कोटींचे विविध प्रकल्प आणून त्यांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत, असे सामंत यांनी घोषित केले.

एका उद्योजक कंपनीचे एमडी सुरेश यांनी त्यांच्या उद्योग समूहाला दोन वर्षांमध्ये जसा प्रतिसाद हवा तसा मिळाला नाही असे म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना किंवा मलाही समोरासमोर जाऊन कुणाला उत्तर देण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

आदित्य ठाकरे यांचे आरोप राजकीय आहेत. आघाडी सरकारच्या काळात शेवटच्या आठ महिन्यात बैठक झाली का? याचा दाखला आदित्य यांनी द्यावा. मी प्रामाणिकपणे आणि ठामपणाने सांगतो वेदांताचा एमओयू झाला नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार उच्चाधिकार समितीची बैठक १५ जुलैला झाली. १४ जुलैला देवेंद्र फडणवीस यांनी वेदांत फॉसकॉन कंपनीला महाराष्ट्र उद्योग स्थापन करण्यासाठी पत्र पाठवले होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प गुजरातला पाठवण्यासाठी बैठक घेतली, या आरोपात तथ्य नाही असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या