
मुंबई | Mumbai
शिंदे गटाच्या (Shinde Group) बंडखोरीमुळे राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळले आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपाच्या (BJP) पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले.आतापर्यंत शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार एकनाथ शिंदेसह सरकारमध्ये सामील झाले आहेत. आज आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी माध्यमांशी बोलताना एक मोठे विधान केले आहे....
येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये ठाकरे गटातील उरलेले आमदारही शिंदे गटात येणार आहेत, असे मोठे विधान त्यांनी केले आहे.
शिरसाट म्हणाले की, जेव्हा शिदेंचा उठाव झाला, तेव्हा गुवाहाटीहून मी प्रतिक्रिया दिली होती की उद्धव ठाकरेंची दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळेच शिवसेना संपत आहे. तेच प्रकार आज चालू आहेत. काय चालू आहे, कोण बोलत आहे, कुणाबद्दल बोलत आहे.
पक्षाचे कुणाला देणे-घेणे आहे की नाही. स्वत:ची टिमकी वाजवण्यासाठी पक्षाचा वापर आजही चालू आहे. हे लोक कोण आहेत. ग्राऊंड लेव्हलला यांनी काम केले आहे का? ग्राऊंड लेव्हलची निवडणूक कशी लढतात हे यांना माहिती आहे का? असा सवाल संजय शिरसाट यांनी यावेळी उपस्थित केला.
त्यांच्या पक्षातल्या उरल्या-सुरल्या आमदारांना विचारा ग्राऊंड लेव्हलला आपली काय परिस्थिती आहे. आपल्याला लाईमलाईटमध्ये कसे येता येईल, अशाच पद्धतीने यांचे (संजय राऊतांचे) सगळे चालले आहे. हे पक्षासाठी घातक आहे. पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे. तरी उद्धव ठाकरे का गप्प आहेत, हे मला माहिती नाही.
हा जो सकाळचा साडेनऊचा भोंगा चालतो, त्याला लोकही कंटाळले आहेत. आम्ही ग्राऊंड लेव्हलला काम करतो. पक्षातल्या ज्या आमदार, कार्यकर्त्यांना पुढे निवडणुका लढवायच्या आहेत, त्यांना माहिती आहे, की जर असेच बोंबलत बसले, तर ते निवडणूक लढवायच्याही मनस्थितीत राहणार नाहीत, आठ ते दहा दिवसांमध्ये उरलेले आमदारही शिंदे गटात येतील, असा दावा त्यांनी केला आहे.