अजित पवार मुख्यमंत्री होणार का? प्रफुल्ल पटेल स्पष्टच बोलले

अजित पवार मुख्यमंत्री होणार का? प्रफुल्ल पटेल स्पष्टच बोलले

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार अशा चर्चांना उधाण आले आहे. आता प्रफुल्ल पटेल (praful Patel) यांनीही अजित पवार मुख्यमंत्री होणार का? यावर प्रतिक्रिया दिली आहे...

ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आमच्या पक्षाने एनडीएत सहभाग घेतला. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसरी टर्म मिळवण्यासाठी आम्ही सगळे ताकदीने लढणार आहोत. आपला देश जीडीपीमध्ये दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आला आहे. पुढील पाच वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो, असा विश्वास आहे. त्यासाठी एक स्थिर, चांगले आणि विकासशील सरकारची गरज आहे, असे ते म्हणाले.

अजित पवार मुख्यमंत्री होणार का? प्रफुल्ल पटेल स्पष्टच बोलले
महायुतीचा राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा फॉर्म्युला ठरला; कुणाच्या वाट्याला किती जागा?

अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चेवर ते म्हणाले की, आज ती जागा रिकामी नाही. मग चर्चा कशाला करतात? अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. ते आमच्या पक्षाचे नेतृत्व आज नाही तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात करत आलेले आहेत. काही नवीन गोष्ट नाही. कधी ना कधी काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अजित पवार मुख्यमंत्री होणार का? प्रफुल्ल पटेल स्पष्टच बोलले
"चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या"; चंद्रशेखर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com