Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या…म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, राज ठाकरेंनी सांगितलं ‘राज’कारण

…म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, राज ठाकरेंनी सांगितलं ‘राज’कारण

मुंबई । Mumbai

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा (Raj Thackeray On Ayodhya tour) तूर्तास स्थगित केला आहे. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. हा दौरा स्थगित का केला यावर आज राज ठाकरेंनी पुण्यातील (Pune) गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना भाष्य केलं.

- Advertisement -

‘मी अयोध्या दौरा जाहीर केला आणि माझ्यावर टीका होऊ लागली. हा सगळा सापळा हे लक्षात आलं. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली,’ असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरेंचा राणा दाम्पत्याला टोला, म्हणाले, “मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला…”

तसेच, ‘मला अयोध्येला येऊ देणार नाही, अशा वल्गना काही जण करत होते. मला अनेकांकडून माहिती मिळत होती. अगदी मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेश….पण हा सगळा ट्रॅप होता. आपण या ट्रॅपमध्ये आपण फसायला नको हे माझ्या वेळीच लक्षात आले म्हणून मी माझ्या दौरा स्थगित केला आहे,’ असे ते म्हणाले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, ‘प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासोबतच कारसेवकांना मारल्यानंतर शरयू नदी मृतदेह टाकण्यात आले होते. त्याचे दर्शन मला घ्यायचे होते. जर मी अयोध्येत गेलो असतो आणि तिथे काही झालं असतं, तर माझ्या कार्यकर्यांवर गुन्हे दाखल झाले असते. माझे कार्यकर्ते मी हकनाक घालवणार नाही. तिकडे केसेस टाकल्या गेल्या असत्या.’

निवडणुका नाही तर उगाच भिजत भाषण का करायचं?; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

तसेच ‘एक कोणी तरी खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन देतो हे शक्य आहेत आहे का? माझ्यावर टीका होणार असेल तरी चालेल पण कार्यकर्ते अडकू देणार नाही,’ असे राज ठाकरे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या