Friday, April 26, 2024
Homeराजकीयपंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर का संतापले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर का संतापले?

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे पुन्हा एकदा काँग्रेसवर (Congress) चांगलेच संतापले असल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत (BJP Parliamentary Party meeting) काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

- Advertisement -

संसदेच्या (Parliamentary) कामकाजात काँग्रेस अडथळा आणत असल्याचा आरोप करत मोदींनी संताप व्यक्त केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस संसदेचं कामकाज आणि चर्चा दोन्ही होऊ देत नाही. काँग्रेसकडून बैठकांवर बहिष्कार टाकला जात आहे. करोनावर (Corona) बैठक बोलावली त्यावर बहिष्कार टाकला आणि इतर पक्षांनाही त्यात सहभागी होण्यापासून थांबवलं असंही मोदींनी म्हटलं. तसेच काँग्रेस आणि विरोधकांच्या या कारनाम्यांना जनतेसमोर उघडं पाडा असं पंतप्रधान मोदींनी भाजप खासदारांना (BJP MP) सांगितलं आहे.

गेल्या आठवड्यात लोकसभा (LokSabha) आणि राज्यसभेत (RajyaSabha) काय कामकाज झालं याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Union Minister Pralhad Joshi) आणि व्ही मुरलीधरन यांनी (V Muraleedharan) दिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh), भाजपाध्यक्ष जे पी नड्डा (Defence Minister Rajnath Singh) आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.

दरम्यान, पेगासस हॅकिंग (Pegasus spyware) आणि नवीन कृषी कायदे (Farm Law) परत घेण्याच्या मागणीवरुन काँग्रेसने घातलेल्या गोंधळामुळे सोमवारी राज्यसभेची कारवाई सहावेळ स्थगित करावी लागली. विरोधकांनी हातात पोस्टर घेऊन दिवसभर संसदेत गोंधळ घातला. विरोधकांनी स्पायवेयर फोन हॅकिंग प्रकरणावर चर्चा करणे आणि याचा तपास करण्यासाठी उच्च स्तरिय समितीकडून चौकशी करणयाची मागणी केली. तसेच, या मगाण्या पूर्ण होईपर्यंत संसदेची कार्यवाही चालू देणार नाहीत, असा इशाराही दिला.

तसेच विरोधकांनी लोकसभेतही प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळादरम्यान सरकारने सोमवारी दोन विधेयक द फेक्‍टरिंग रेगुलेशन (अमेंडमेंट) बिल 2021 (The Factoring Regulation (Amendment) Bill 2021) आणि नॅशनल इंस्‍टीट्यूट ऑफ फूड टेक्‍नोलॉजी एंटरप्रिन्‍योरशिप अँड मॅनेजमेंट बिल 2021 (National Institute of Food Technology Entrepreneurship and Management Bill 2021) मंजूर करुन घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या