Thursday, April 25, 2024
Homeराजकीयकिरीट सोमय्या आता गप्प का?; राष्ट्रवादीचा सवाल

किरीट सोमय्या आता गप्प का?; राष्ट्रवादीचा सवाल

मुंबई l Mumbai

राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. अशातच आता महाविकास आघाडीच्या सरकारला सतत धारेवर धरणारे

- Advertisement -

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत आले आहेत. किरीट सोमय्या यांचा मुलगा आणि भाजप नगरसेवक नील सोमय्या यांच्या विरुध्द खंडणीचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी किरीट सोमय्यांना या प्रकरणी घेरलं असून आता सोमय्या गप्प का?, असा सवाल केला आहे. किरीट सोमय्या यांच्या मुलाची खंडणीप्रकरणी चार तास कसून पोलिस चौकशी झाली आहे. यावर आता किरीट सोमय्या गप्प का?, असा त्यांनी केला आहे. तसंच, ज्याला कर नाही त्याला डर कशाची, असा प्रश्नही आमच्या मनात येतो. यासंबंधी किरीट सोमय्या यांनी त्यांच्या मुलाच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी तपासे यांनी केली आहे.

दरम्यान, नील सोमय्या यांची पोलिस चौकशी झाल्यानंतर आता किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात कर्जतमधील जमिनीची अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप सोमय्या यांचा आहे. त्या प्रकरणात आता आपण कर्जत तहसीलदाराची भेट घेणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. ट्विटरद्वारे सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना वाद अधिक पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘उद्या मी कर्जत तहसीलदारची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात कर्जत जमिनीच्या अपूर्ण माहितीचा पाठपुरावा करणार आहे’, असं ट्वीट सोमय्या यांनी केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या