अजित पवार गटातील मंत्र्यांनी शरद पवारांची भेट का घेतली? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण

अजित पवार गटातील मंत्र्यांनी शरद पवारांची भेट का घेतली? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण

मुंबई | Mumbai

आज अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधान आले होते. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवारांची भेट का घेतली? याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली...

ते म्हणाले की, आज आमचे सर्वांचे दैवत, आमचे सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित दादा पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनजंय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसह मंत्री महोदय यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झालो. शरद पवार बैठकीसाठी येथे आले असल्याचे आम्हाला समजल्यावर आम्ही त्यांच्या भेटीची वेळ न मागता त्यांच्या भेटीकरता आलो. ही संधी साधून आम्ही त्यांची भेट घेतली.

अजित पवार गटातील मंत्र्यांनी शरद पवारांची भेट का घेतली? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण
पावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? राज ठाकरेंनी एका शब्दातच विषय संपवला

पवार साहेबांच्या पाया पडून आम्ही आशीर्वाद मागितले. आम्ही सर्वांनी साहेबांना विनंतीही केली की, आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहू शकतो त्यासाठीही योग्य विचार करावा. आणि येणाऱ्या दिवसांत मार्गदर्शन करावे अशी आम्ही विनंती केले असल्याचे पटेल म्हणाले.

अजित पवार गटातील मंत्र्यांनी शरद पवारांची भेट का घेतली? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण
पोहण्याचा मोह आला अंगलट! मार्वे बीचवर ५ शाळकरी मुलं बुडाली

शरद पवारांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमचे जे मत होते, विनंती होती ते ऐकून घेतले. आणि भेटीनंतर आता इथून जात आहोत. उद्यापासून राज्याच्या विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे, सर्व मंत्री अजित दादांच्या नेतृत्त्वामध्ये आपपल्या विभागाची जबाबदारी पार पाडतील, असेही त्यांनी सांगितले.

अजित पवार गटातील मंत्र्यांनी शरद पवारांची भेट का घेतली? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण
Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; 'या' भागांत मुसळधार कोसळण्याचा अंदाज
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com