Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याअंबिका सोनींनी का नाकारलं पंजाबचं मुख्यमंत्रीपद?, जाणून घ्या राज'कारण'

अंबिका सोनींनी का नाकारलं पंजाबचं मुख्यमंत्रीपद?, जाणून घ्या राज’कारण’

दिल्ली | Delhi

पंजाब(Punjab Political News) काँग्रेसमध्ये (Punjab Congress News) सुरू असलेल्या ओढाताणीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना राजीनामा द्यावा लागला. शनिवारी त्यांनी राज्यपालांकडे (Punjab Governor) आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

- Advertisement -

दरम्यान पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण ( punjab new chief minister ) असतील? यावर सस्पेन्स कायम आहे. अमरिंदर सिंग यांच्या जागी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी (ambika soni) यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर सोनिया गांधी ( sonia gandhi ) यांनी दिल्याचं सांगण्यात येतंय. पण अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्पष्टपणे नाकारली आहे. तसेच, पंजाबचा मुख्यमंत्री, पंजाब का मुखिया हा शीख व्यक्ती असला पाहिजे, असे माझे मत आहे. मी गेल्या ५० वर्षांपासून हेच म्हणते आहे. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाला नकार दिला असून आज संध्याकाळपर्यंत नाव निश्चित झालं पाहिजे, असेही अंबिका सोनी यांनी म्हटलं. काँग्रेसचे सरचिटणीस आणि निरीक्षक हे चंडीगडमध्ये जाऊन तेथील आमदारांची मतं जाणून घेत आहेत. मला विश्वास आहे की, पंजाबचा मुख्यमंत्री हा शीख व्यक्तीच असेल, असेही अंबिका सोनी यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत अंबिका सोनी?

इंदिरा गांधींनी अंबिका सोनी यांना १९६९ मध्ये पक्षात आणलं होतं. फाळणी झाली तेव्हा अंबिका सोनी यांचे वडील अमृतसरमध्ये जिल्हाधिकारी होते. त्यांनी नेहरुंसोबत जवळून काम केलं होतं. अंबिक सोनी यांनी संजय गांधी यांच्यासोबतही काम केलं होतं. तसंच पक्षाच्या अनेक संघटनांची जबाबदारी त्यांच्याकडे होते. अंबिका सोनी पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील असून अनेकदा राज्यसभेच्या सदस्य राहिल्या आहेत.

कोणाला मिळू शकतं मुख्यमंत्रीपद?

सध्या, हरीश रावत, अजय माकन आणि नवज्योतसिंग सिद्धू हॉटेलमध्येच मुख्यमंत्र्यांच्या नवीन नावांवर विचारमंथन करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत चार नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय सुनील जाखड या शर्यतीत आघाडीवर आहेत. याशिवाय नवज्योतसिंग सिद्धू, प्रताप बाजवा आणि सुखजिंदर सिंग रंधावा यांचेही नाव या शर्यतीत आहेत.

नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशिवाय विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून, पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड़, माजी मंत्री सुखजिंदर सिंग रंधावा, तृप्त राजिंदर सिंह बाजवा आणि राज्यसभा सदस्य प्रताप सिंह बाजवा यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी, ब्रह्म मोहिंद्रा, विजय इंदर सिंगला, पंजाब काँग्रेसचे कार्यकारीध्यक्ष कुलजीत सिंह नागरा यांची नावंही चर्चेत आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या