Friday, April 26, 2024
Homeराजकीयराहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

दिल्ली । Delhi

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कृषी विधेयकावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज पंजाबमधील मोगा येथे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टररॅली काढण्यात आली. त्यावेळी त्यांना शेतकऱ्यांना संबोधित केले. राहुल गांधी म्हणाले की, सरकारला हे बिल मंजूर करायचा होता तर, त्यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत याविषयी चर्चा का केली नाही?. हे सरकार शेतकऱ्यांचे वाटोळे करणारे सरकार आहे असे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे.

- Advertisement -

मी तुम्हाला खात्री देतो की ज्या दिवशी काँग्रेस पार्टी सत्तेत येईल, आम्ही हे तिन्ही काळे कायदे मोडीत काढू आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ. या कायद्यांना पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक विरोध असून त्यांनी याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे, असे राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले. काँग्रेसने दिलेल्या आश्वासनापासून आम्ही एक इंच देखील मागे हटणार नाही, असे राहुल सभेत ठामपणे म्हणाले. नरेंद्र मोदी सरकारचा एमएसपी संपवण्याचा इरादा आहे आणि शेतीचा संपूर्ण बाजार अंबानी आणि अदाणी यांच्या हवाली करावा असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र काँग्रेस पक्ष असे होऊ देणार नाही. हा सर्व प्रकार शेतकऱ्यांची जमीन आणि पैशाबाबतचा आहे. पहिल्यांदा मी हा प्रकार भठ्ठा परसौलमध्ये पहिला. जेव्हा यांना पाहिजे तेव्हा ते शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेत होते. आम्ही भूमिअधिग्रहण कायदा बदलला आणि तुमच्या जमिनीचे रक्षण केले. बाजार मुल्यापेक्षा चारपट जास्त भाव दिला. मोदी आले आणि त्यांनी आमचा नवा कायदाच बदलून टाकला. शेतकऱ्यांच्या जमीनीसाठी आम्ही संसदेत लढलो होतो. शेतकऱ्यांना संपवण्याचा सरकारचा डाव आहे. असेही राहुल गांधी पुढे म्हणाले.

जर या नव्या कायद्याचे देशातील शेतकरी समर्थन करत आहेत किंवा खूश आहेत असे म्हटले तर मग शेतकरी देशभरात या कायद्याविरोधात आंदोलने का करत आहेत, असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला. पंजाबमध्ये शेतकरी हे आंदोलन का करत आहेत असे विचारतानाच करोनाच्या या संकटात हे तीन कायदे लागू करण्याची इतकी घाई काय होती, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस दलालांचा दलाल- प्रकाश जावडेकर

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाला सर्व देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेसनेही या मुद्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस दलालांचा दलाल असल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे. देशात कृषी विधेयक आणण्यासाठीचा प्रस्ताव काँग्रेसचाच होता. आता या कायद्यांनाच विरोध केला जात आहे हा विरोध राजकीय असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या कायद्यामुळे देशतील दलाल नेस्तनाबूत होतील आणि शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार असल्याचं जावडेकरांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या