
जळगाव | Jalgaon
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या सर्वोच्च न्यायलयात दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे.
यात महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. या पार्श्वभूमीर राज्यातील हालचालींना वेग आला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते. उद्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी बाबत विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलणे टाळले. सर्वांना शुभेच्छा म्हणत मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला.