संयम सुटला तर काय कराल?; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल
राजकीय

संयम सुटला तर काय कराल?; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल

सुशांत सिंह प्रकरणाला चांगलाच राजकीय रंग चढतांना दिसत आहे

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

सुशांत सिंह प्रकरणाला चांगलाच राजकीय रंग चढतांना दिसत आहे. या प्रकरणात भाजपा अप्रत्यक्षपणे नाव न घेता मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हंटले होते,"बॉलिवूडमधील अनेक कलाकार माझे मित्र आहेत आणि तो काही गुन्हा नाही. सुशांत सिंह प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. माझ्याविरुद्ध केवळ गलिच्छ राजकारण सुरू आहे. पण मी संयम बाळगला आहे." यावरूनच भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर आदित्य ठाकरेंना सवाल केला आहे

अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे,"'मी आजही संयम ठेवलेला आहे'...या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेने काय घ्यावा? ही धमकी आहे का? संयम सुटला तर काय कराल याचाही खुलासा केलात तर बरे होईल." असा सवाल त्यांनी केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com