Friday, April 26, 2024
Homeराजकीय‘नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार?’

‘नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार?’

मुंबई –

भाजपने उदयनराजे आणि संभाजीराजे या दोघांना राज्यसभेवर पाठवले आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष

- Advertisement -

शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत केलं होतं. मराठा आरक्षणाबाबत दोन्ही राजांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरूनच पवारांनी त्यांना टोला लगावला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी मात्र शरद पवार यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

‘शरद पवार यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे आश्चर्य वाटतं. पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार? या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही.’ असे ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत काही दिवसांपूर्वी भाजप खासदार उदयनराजे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर जातनिहाय आरक्षण रद्द करा अशी भूमिका मांडली होती. तसंच, मराठा समाज आता एकटा नाही, एवढंच सांगतो. मी सोबत आहे, असंही ते म्हणाले आहेत. तर, सरकार दखल घेत नसेल लढावंच लागेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या