पहिल्या अधिवेशनात भूमिका काय? सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं

पहिल्या अधिवेशनात भूमिका काय? सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | Mumbai

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) आजपासून सुरु झाले आहे. २५ मार्चपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) हे त्यांच्या पहिल्याच अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत...

यावेळी सत्यजीत तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि अधिवेशनात उपस्थित करणाऱ्या मुद्द्यांविषयी त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, अधिवेशनात सुशिक्षित बेरोजगार आणि सामान्यांचे प्रश्न प्रकर्षाने मांडणार आहे. हे पहिले अधिवेशन असल्याने शाळेतील पहिला दिवस जसा असतो, तशा भावना निर्माण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

पहिल्या अधिवेशनात भूमिका काय? सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं
नव्या राज्यपालांनी अभिभाषणात मांडले 'हे' महत्त्वाचे मुद्दे; वाचा सविस्तर

मी युवकांचा आवाज बनून सभागृहात काम करणार आहे. त्याबाबत माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा आणि उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा मुद्दा सभागृहात मांडणार असल्याचेही तांबे यांनी सांगितले.

पहिल्या अधिवेशनात भूमिका काय? सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं
कसबा पोटनिवडणुकीतील BJP उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com