गुजरातच्या मुंद्रा बंदरावर 30 हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले त्याचं काय?

गुजरातच्या मुंद्रा बंदरावर 30 हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले त्याचं काय?
छगन भुजबळ

पुणे(प्रतिनिधी)

गुजरातच्या मुंद्रा बंदरावर 30 हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले त्याचं काय? असा सवाल करीत ज्याने इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील, असा टोला छगन भुजबळ यांनी समीर वानखेडेंना लगावला आहे. समीर वानखेडे आणि त्यांचं कुटुंब मुस्लीम असल्याचं सिद्ध झालं आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले. पुण्यामध्ये ते वाहिनीशी बोलत होते.

गुजरातच्या मुंद्रा बंदरावर 30 हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले त्याचं काय? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. त्या प्रकरणाचा फोकस बदलण्यासाठी महाराष्ट्रावर शिफ्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आर्यन खानला जामीन मिळाला आहे. ज्याने त्याला पकडलं त्यानं कायद्याच्या विरोधात काम केलं तो अडचणीत आला आहे. समीर वानखेडे मुस्लीम आहेत हे निकाहनाम्यावरून सिद्ध झालं आहे. नवाब मलिक देखील मुस्लिम आहेत. त्यांच्या मागे राष्ट्रवादी उभी आहे, असं भुजबळ म्हणाले. भाजप विरोधी सरकार जिथे जिथे आहेत, तिथे तपास यंत्रणा चुकीचे काम करत आहेत, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

आर्यन खान प्रकरण, समीर वानखेडे, के. पी. गोसावी प्रकरणी नवाब मलिक मांडत आहेत त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नवाब मलिकांनी जी भूमिका मांडली ती पक्षाची भूमिका आहे, पक्ष त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे, असंही ते म्हणाले.

शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकार लक्ष देत आहे. शेतकऱ्यांना मदतीचं वाटप करण्यात येत आहे.भारत सरकारच्या तपासयंत्रणा ज्या आहेत त्या भाजप विरोधी सरकार असतील तिथं अतिरेक करत आहेत. चुकीचे अधिकारी चुकीचं काम करत आहेत. शेतकरी महाराष्ट्राचा आत्मा आहे. महाराष्ट्र हा विमानतळ, गोद्या, जेठ्ठीसाठी प्रसिद्ध आहे तसा तो बॉलिवू़ड साठी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजप महाविकास आघाडी सरकारविषयी जनतेत रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आरोपही त्यांनी केला.

Related Stories

No stories found.