ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी दिला राजीनामा

कोलकाता । Kolkata

पश्चिम बंगालमध्ये येत्या काही महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ममत बॅनर्जींना वारंवार धक्के बसत आहेत. शुंभेदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या शिवाय तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते, आमदार भाजपमध्ये गेले आहेत. दरम्यान आज पुन्हा एका मंत्र्याने ममता बॅनर्जी यांना राजीनामा सुपुर्द केला आहे.

ममता सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. लक्ष्मी रतन शुक्ला हे बंगाल सरकारमध्ये क्रीडामंत्री होते. त्यांनी मंगळवारी राजीनामा दिला. मात्र, अद्याप ते तृणमूल काँग्रेसचेच आमदार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रतन शुक्ला यांची राजकारण सोडण्याची इच्छा आहे. त्यांनी मंत्री पदाशिवाय हावडाच्या टीएमसी जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे.

लक्ष्मी रतन शुक्ला यांनी भारतासाठी तीन वनडे सामने खेळले आहेत. याशिवाय ते आयपीएलमध्येही कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेविल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते राजकारणात आले. ते बंगालच्या उत्तर हावडातून आमदारही झाले. यानंतर ममता सरकारमध्ये त्यांना क्रीडामंत्री बनवण्यात आले होते.

तृणमूल काँग्रेसने बंगालच्या जनतेची नस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी 190 च्या जवळपास जागा जिंकू शकते, असे पक्षाच्या अतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 211 जागांवर विजय मिळवला होता. टीएमसीच्या अतर्गत सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजपला 98 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला केवळ 6 जागांवरच समाधान मानावे लागणार असल्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणानुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 51 टक्क्यांपेक्षा थोडी अधिक मते मिळू शकतात.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *