दीदींचा भाजपला मोठा धक्का! 'मुकुल रॉय' यांची घरवापसी

दीदींचा भाजपला मोठा धक्का! 'मुकुल रॉय' यांची घरवापसी

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं मोठं स्वप्न उधळून लावल्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपला एका मागोमाग एक धक्के देत आहेत.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करणाऱ्या मुकुल रॉय यांची शुक्रवारी तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी झाली. ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत रॉय पितापुत्राने तृणमूलमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपाला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारासंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुकुल रॉय गैरहजर होते. तेव्हापासून रॉय भाजपाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा होती. अखेर शुक्रवारी मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला.

दीदींचा भाजपला मोठा धक्का! 'मुकुल रॉय' यांची घरवापसी
शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर 'सिल्व्हर ओक'वर; कोणती रणनीती ठरणार?

तृणमूलमध्ये परतल्यानंतर मुकुल रॉय यांनी समाधान व्यक्त केले. सद्यस्थितीत कोणीही भाजपात राहू शकणार नाही, असे मुकुल रॉय यांनी सांगितले. तर मुकुल रॉय यांचे तृणमूलमध्ये स्वागत असून त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, असे ममता बॅनर्जींनी सांगितले.

मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांचे खास मानले जायचे. पण नंतपर मतभेदानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांनी तृणमूलमधून राजीनामा दिला होता. त्यानतंर ते भाजपमध्ये आले होते. विधानसभा निवडणुकीत ते नदियाच्या कृष्णानगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. ते विजयी देखील झाले पण त्यांचा मुलगा शुभ्रांशु बीजपूरमधून पराभूत झाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com