कोलकाता । Kolkata

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने खास रणनीती तयार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी भाजपाला दिला आहे.

भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांनी आज तृणमूलमध्ये प्रवेश केला. सौमित्र लोकसभेत बिशुनपूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. भाजप तृणमूलचे नेते आपल्या गळाला लावत असल्याने तृणमूलनेही आपण भाजपला धक्का देऊ शकतो याचे संकेत यातून दिले आहेत.
.'पश्चिम बंगालमध्ये भाजपनं दुहेरी आकडा गाठल्यास ट्विटर सोडेन'.
दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात माजी मंत्री आणि ममतांचे विश्वासू सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सौमित्र खान हे भाजपच्या युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. भाजप हा आता फक्त संधीसाधूंचा पक्ष बनला असून निष्ठवान नेत्यांचा काहीही सन्मान राहिलेला नाही. एक महिला असल्याने भाजपमध्ये काम करणे यापुढे शक्य नसल्याचं सुजाता मंडल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुजाता यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करताच सौमित्र खान यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सुजाता यांना तलाक देण्याची तयारी सुरू केली आहे. सुजाता यांच्या घराबाहेर तैनात असलेली सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. सुजाता आणि सौमित्र यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आज तो समोर आल्याचं बोललं जात आहे. यावर सौमित्र यांनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं. 'आमच्या कुटुंबात मतभेद होते. कुटुंबात थोडे वाद असूच शकतात. मला त्याला राजकीय रंग द्यायचा नाही. सुजाता तृणमूलमध्ये सामील झाल्या याबद्दल मला दु:ख वाटतं,' असं सौमित्र म्हणाले.