Video : 'आम्ही राष्ट्रवादीला कधीही बुडवू'; भुजबळांचा संदर्भ घेत सेना खासदाराचे विधान

जशी काय ही बाबाची जहागीरच आहे

मुंबई | Mumbai

राज्यात राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (Shivsena) व कॉंग्रेस (Congress) या तिन्ही पक्षाचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार (MahavikasAghadi Govt) आहे. मात्र या तिघांमध्ये अनेक वेळा काही मुद्यांवरून मतभेद होताना दिसून येतात. दरम्यान जिल्हाधिकारी आंचल गोयल (Collector Aanchal Goyal) यांच्या नियुक्तीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद (Dispute between Shiv Sena and NCP) समोर आला आहे. गोयल यांच्या नियुक्तीवरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष पेटला असून शिवसेना खासदार संजय जाधव (Shivsena MP Sanjay Jadhav) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गरज पडल्यावर माकडीणही तिच्या पिल्लाला बुडवते. आम्हीही राष्ट्रवादीला बुडवू, असं खळबळजनक विधान शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केलं आहे. खासदार संजय जाधव यांनी जालन्यात (Jalana) शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना हा इशारा दिला आहे.

भुजबळांवर काय म्हणाले खासदार जाधव

आम्ही प्रतिष्ठापणाला लावली. आयुक्तांकडे पत्र लिहिले. आयुक्तांनी आदेश दिले यांना दुकान बहाल करा. त्यानंतरही भुजबळ साहेबांनी पत्र दिले आणि म्हटले हे दुकान दुसऱ्यांना जोडा. जशी काय ही बाबाची जहागीरच आहे. मग आमच्यासुद्धा भावना आनावर होतात, हे लक्षात ठेवा, असे खासदार संजय जाधव यांनी म्हटले आहे.

Video : 'आम्ही राष्ट्रवादीला कधीही बुडवू'; भुजबळांचा संदर्भ घेत सेना खासदाराचे विधान
तीन कोटीचे सोने लुटणाऱ्या नाशिकच्या सूत्रधारास अटक

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com