Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या“आम्ही बारसूतल्या कष्टकऱ्यांसोबत, भांडवलदारांच्या...”; सत्ताधाऱ्यांवर राऊतांची खोचक टीका

“आम्ही बारसूतल्या कष्टकऱ्यांसोबत, भांडवलदारांच्या…”; सत्ताधाऱ्यांवर राऊतांची खोचक टीका

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्प चांगलाच चर्चेत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रकल्पाला केलेला विरोध. पोलिसांनी केलेली कारवाई. ग्रामस्थांचा विरोध जुगारून सुरू असलेले माती परीक्षण, उद्धव ठाकरे यांनी दिलेले पत्र, आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका यामुळे हा प्रकल्प चांगलाच तापला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहे.

- Advertisement -

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत (Sanjay raut) यांनी बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर आणि गावकऱ्यांच्या, भूमिपुत्रांच्या विरोधात जाऊन या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही, अशा खोचक शब्दांत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत विविध विषयांवर भाष्य केले आहे.

Char Dham Yatra : केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला… थरकाप उडवण्याऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

यावेळी बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना लोकांचे बोलणे समजून घ्यायचे आहे. ज्या पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार होतोय. अॅट्रॉसिटी सुरु आहेत. ती लोक आपली जमिन सोडायला तयार नाहीत, हे सत्य आहे. अशा वेळी या सगळ्यांचे म्हणणे समजून घ्यावं, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, आणि त्यानंतर ते महाडला जातील. जेव्हा जेव्हा कोकणावर, कोकणी जनतेवर आघात झाला, तेव्हा शिवसेना तेथील लोकांसाठी धावून गेली आहे. त्यामुळे शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही. शिवसेना तिथल्या कष्टकरी आणि शेतकरी यांच्यासोबत आहे, अशा शब्दात राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

Samruddhi Mahamarg : शेतकऱ्याने ट्रॅक्टर आडवे करून रोखला ‘समृद्धी महामार्ग’… कारण काय?

तसेच जे भांजवलदारांचे दलाल आहेत, ज्यांची तिकडे गुंतवणूक आहे. परप्रांतीयांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या गुंतवणूकीची भिती वाटते. म्हणून उद्धव ठाकरेंना तिथे येऊ देणार नाही, अशा धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे असे म्हणणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी अटक करण्याचे आदेश द्यावेत. शिवसेनाला थांबवणारा अजून जन्माला नाही आलेला, असेही यावेळी संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

मी सर्वात मोठा जुगारी, मला अटक करा… शेतकऱ्याची अजब मागणी, नेमकं प्रकरण काय?

याला येऊ देणार नाही, त्याला येऊ देणार नाही.. अख्खी शिवसेना तिथे जागेवर आहे. उद्धव ठाकरे आता तिथे पोहोचतील मग काय कराल तुम्ही? त्यामुळे या पोकळ धमक्या देणे बंद करा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. या राज्यात, देशात आणि रत्नागिरीत लोकशाही आहे. आंदोलक चोर गुन्हेगार नाही. जमीन माझी आई आहे आणि जमीन वाचावायचा आम्हाला हक्क आहे, त्यामुळे १४४ कलम लावून काय होणार आहे? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या