Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना भवनावर आमचा दावा नाही!; शिंदे गटाचे स्पष्टीकरण

शिवसेना भवनावर आमचा दावा नाही!; शिंदे गटाचे स्पष्टीकरण

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

शिवसेना (Shiv Sena) भवन आणि पक्षनिधी आमच्या ताब्यात मिळावा अशी कोणत्याही प्रकारची याचिका आम्ही केलेली नाही. संबंधित याचिका दाखल करणारे ॲड. आशीष गिरी यांच्याशी शिवसेना पक्षाचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सोमवारी दिले.

- Advertisement -

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची खरी संपत्ती असून ती आम्हाला पुरेशी आहे, असेही म्हस्के म्हणाले. ॲड. आशीष गिरी (Adv. Ashish Giri) यांनी शिवसेना भवन तसेच पक्षनिधी शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर म्हस्के यांनी वरील खुलासा केला.

महाराष्ट्रात ‘येथे’ मास्क सक्ती; वाढत्या कोरोनाच्या धास्तीने घेतला निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी याआधीच आम्ही कधी शिवसेना भवन वा पक्षनिधी यावर दावा करणार नाही असे आधीच स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि महाविकास आघाडी यांचा सहानुभूती मिळविण्याचा कट असल्याचा आरोपही म्हस्के यांनी केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

गेल्या तीन-चार दिवसांपासून अयोध्या दौऱ्याला जो प्रचंड प्रतिसाद जनमानसात मिळाला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडी यांच्यात चलबिचल निर्माण झाली आहे. त्यांचे चित्त थाऱ्यावर राहिलेले नाही. त्यामुळेच लोकांची सहानुभूती मिळावी यासाठीच हा ठाकरे गट आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांचा कट आहे, असा आरोपही नरेश म्हस्के यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या