Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'लोकांचा पाठिंबा आहे तोपर्यंत आपण खंबीर आहोत'; पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा

‘लोकांचा पाठिंबा आहे तोपर्यंत आपण खंबीर आहोत’; पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा

मुंबई | Mumbai

माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू, मला चक्रव्युहात जायचे माहिती आहे तसेच बाहेरही यायचे माहिती आहे. माझ्या विरोधात कटकारस्थान आणि राजकारण सुरु आहे. परंतू, काही झाले तरी मी खंबीर आहे. जोपर्यंत माझ्याकडे जनसंपत्ती आहे. लोकांचा पाठिंबा आहे तोपर्यंत आपण खंबीर आहोत, असा इशारा पंकजा मुंडे यांनी आपल्या विरोधकांना दिला आहे. त्या गोपीनाथगड येथून बोलत होत्या. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा देतानाच येत्या काळात केवळ भगवान गडावरच नाही तर मुंबईतील शिवाजी पार्क भरून दाखवायचं आहे. तिथे शक्तिप्रदर्शन करायचं आहे, अशी घोषणा पंकजा यांनी केली.

- Advertisement -

आपले राजकारण संपले नाही

या वेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, माझ्यावर अनेक आरोप झाले. अपप्रचार करण्यात आला. पंकजा मुंडे या राजकारण करत नाहीत. त्या घरातूनही बाहेर पडत नाहीत असा अपप्रचारकरण्यात आला. परंतू, करोना व्हायरस ही महामारी जगभर आहे. राज्य आणि देशातही आहे. अशा वेळी सभा घेऊन गर्दी करु नका अशी विनंती अधिकाऱ्यांकडून मला करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या सभा घेणे घराबाहेर पडणे मी टाळत होते, असे मुंडे म्हणाल्या. दरम्यान, या पुढे आपण जनसेवेसाठी घराबाहेर पडणार आहोत. आपले राजकारण संपलं नाही. करोना काळ असला तरी सर्व नियमांचे पालन करुन आपण घराबाहेर पडणार, असेही पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या.

पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम

मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगड येथील दसरा मेळाव्यात बोलताना पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम दिला. आता राष्ट्रीय मंत्री झाली आहे. पक्षाच काम देशाच्या पातळीवर करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात स्पष्ट केले. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर पंकजा मुंडेंनी शिवेसेनेत प्रवेश करावा, असं माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं होतं.

शेतकऱ्यांसाठी अधिक मदतीची अपेक्षा

दरम्यान, राज्य सरकारने पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. या पॅकेजचे स्वागत आहे. परंतू, हे पॅकेज पुरेसे नाही. दहा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही, असे मुंडे म्हणाल्या.

एकदा शिवाजी पार्क भरवायचं आहे

करोनामुळे या वेळी दरवर्षीप्रमाणे मेळावा घेता आला नाही. तरीही तुम्ही गर्दी केली. पण ठिक आहे. पुढच्या वर्षी याही पेक्षा अधिक गर्दी करु. इतकेच नव्हे तर एकदा आपल्याला शिवाजी पार्क भरवायचं आहे. त्या दृष्टीने आपण राज्यभर फिरणार आहोत, असेही पंकजा मुंडे यांनी या वेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या