शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवकपदी विराज कावडिया निश्चित

शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवकपदी विराज कावडिया निश्चित

जळगाव - Jalgaon :

जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त जागी युवाशक्तीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विराज कावडिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

जळगाव मनपात अडीच वर्षानंतर सत्तांतर झाले असून शिवसेनेची सत्ता आहे. पक्षाच्या धेय्य धोरणानुसार प्रत्येक कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी राजीनामा दिला.

त्यानंतर रिक्त जागेसाठी अनेकांनी नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली. अखेर शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी आमदार सुरेशदादा जैन, संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन यांनी केलेल्या चर्चेनुसार स्वीकृत नगरसेवक म्हणून विराज कावडिया यांच्या नावाची शिफारस केली आहे.

त्यानुसार संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवकपदी विराज कावडिया यांचे नाव निश्चित झाले असल्याचे पत्र महानगरप्रमुख शरद तायडे यांनी दिले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com