सिंधुदुर्गातील सात हत्याकांडामागे नारायण राणे; विनायक राऊतांचा गंभीर आरोप

सिंधुदुर्गातील सात हत्याकांडामागे नारायण राणे; विनायक राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

सिंधुदुर्गातील (Sindhudurg) 7 जणांच्या खुनात नारायण राणेंचा (Narayan Rane) प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा गंभीर आरोप खा. विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे...

आज सकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर (Shivsena) गंभीर आरोप केले होते. राणेंच्या आरोपांवर शिवसेनेने (Shivsena) पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे.

खा. विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या नेतृत्वात परिषद घेण्यात आली. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या देखील उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेत राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.

सिंधुदुर्गातील सात हत्याकांडामागे नारायण राणे; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
दिशा सालियनवर बलात्कार कुणी केला?; राणेंनी डागली तोफ

ते म्हणाले की, नारायण राणे (Narayan Rane) यांना त्यांच्या वाढत्या वयामुळे आठवत नसेल. इतरांवर आरोप करताना सिंधुदुर्गात खून, दरोडे, खंडनी असे 9 वर्षे प्रकार घडत होते. मंचेकर, श्रीधर नाईक, गोवेकर यांच्या खुनात कुणाचा सहभाग होता? श्रीधर नाईक खुनात तर राणेंचा थेट सहभाग होता, असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

यावेळी शिवसेनेने एक व्हिडीओ दाखवला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात नारायण राणे यांची कुंडली वाचून दाखवली होती असे म्हणत त्याबाबतचा व्हिडीओ यावेळी दाखवण्यात आला.

सिंधुदुर्गातील सात हत्याकांडामागे नारायण राणे; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलाय का?; अजित पवार कडाडले

सिंधुदुर्गात (Sindhudurg) झालेल्या खूनाबाबत (Murder) पुन्हा तपास करुन त्यामागे कोण होते? याचा शोध घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची भेट घेणार असल्याची माहिती, विनायक राऊत यांनी दिली. राणे कुटुंबाने मुंबईत अविघ्न सोसायटीमध्ये 300 कोटींचा घोटाळा केला, असा दावा त्यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, केंद्रीय सुक्ष्म मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करुन विनायक राऊत आणि 'मातोश्री' संदर्भात ट्विट केले आणि आज त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी जी बडेजावपणाने घोषणा केली होती त्यातून फक्त खोदा पहाड आणि निकला कचरा, अशी अवस्था होती. स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा आणि लाचारी कशी मिळवायची त्याचे हे उदाहरण असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे.

सिंधुदुर्गातील सात हत्याकांडामागे नारायण राणे; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तिघांना अटक

तसेच शिवसेनेकडून किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे केलेल्या आरोपांचा व्हिडीओ दाखवण्यात आला. या पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) अचानक आले.

रिश्ते मे हम आपके बाप लगते हैं : संजय राऊत

कुंडल्या काढण्याच्या धमक्या आम्हाला नका देऊ. याच्या कुंडल्या, त्याच्या कुंडल्या असल्या धमक्या देणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, त्यांच्याही कुंडल्या आमच्याकडे आहेत. महाराष्ट्रातील सरकार मजबूत आहे. त्यामुळे पोकळ धमक्या देण्यात तुमचा वेळ घालवू नका. त्यात तुम्हीच फसाल. आमच्यामागे ईडी (ED), सीबीआय (CBI) लावून तुम्ही आम्हाला कितीही धमक्या दिल्यात तरी रिश्ते मे हम आपके बाप लगते हैं... आणि बाप काय असतो हे तुम्हाला यापुढे रोज दिसेलच, अशा इशारा संजय राऊत यांनी भाजप (BJP) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना दिला.

सिंधुदुर्गातील सात हत्याकांडामागे नारायण राणे; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कोसळला

भाजप नेत्यांकडून वारंवार दिशा सालियनचे चारित्र्यहनन : किशोरी पेडणेकर

दिशा सालियन (Disha Salian) हिच्यावर लैंगिक अत्याचार झालेले नाहीत. तरीही भाजपच्या नेत्यांकडून वारंवार तिचे चारित्र्यहनन केले जात आहे. राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी याप्रकरणात लक्ष घालावे. महाराष्ट्रासारख्या राज्यात एखाद्या महिलेचे मृत्यूनंतरही चारित्र्यहनन होणे, ही चांगली गोष्ट नाही. दिशा सालियनच्या वडिलांनीही शवविच्छेदन अहवालात आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे सांगितले आहे. तिच्या वडिलांनी वारंवार ही बाब सांगूनही दिशा सालियनचे चारित्र्यहनन सुरु आहे. याविरोधात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय महिलांनी आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com