अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवावे
राजकीय

अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवावे

विनायक मेटे यांची मागणी

Rajendra Patil Pune

पुणे|प्रतिनिधी|Pune

मराठा आरक्षण बाबतचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. या आरक्षणासाठी राज्य सरकार मार्फत उपसमिती नेमण्यात आली. त्या उपसमितीचे अध्यक्षपद अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. यापुर्वी देखील राज्याचे मुख्यमंत्रीपद अशोक चव्हाण यांनी भूषविले आहे. त्यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी कोणतेही निर्णय घेतले नाही.

आता सरकारमधील उपसमितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे असताना देखील समजाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेत नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांना उपसमिती पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय, असा गंभीर आरोपही देखील मेटे यांनी केला.

मराठा समन्वय समितीची बैठक आज पुण्यात पार पडली, या बैठकीनंतर ते बोलत होते. विनायक मेटे यांच्या नेतृत्वात राज्यभरातल्या ९ मराठा संघटना एकत्र येऊन मराठा समन्वय समिती गठीत झाली आहे.

अशोक चव्हाण जबाबदारी सांभाळण्यात निष्क्रिय ठरले असल्याने, आता त्या पदावर महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या सारख्या कोणत्याही नेत्याला महाविकास आघाडीतील जबाबदारी द्यावी असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या नाशिक दौर्याच्या वेळी आंदोलन करणार

मराठा आरक्षणाच्या पराश्नावरून अनेक घामोडी घडत असताना मुख्य्म्नात्री उद्धव ठाकरे डोळे मिटून शांत बसले आहेत. ते महाविकास आघाडीतील मंत्र्यांना आदेश देताना दिसत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्याचाही देखील आम्ही निषेध करतो असे मेटे म्हणाले.

अशोक चव्हाण यांना उपसमिती पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक दौर्याहवर आहेत, या निमित्त त्या ठिकाणी उद्या क्रांती दिनी जागरण गोंधळ, मशाली पेटवून आणि काळे कपडे घालून आंदोलन करणार आहोत. मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा रद्द झाल्यास पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन करणार आहे. तसेच या पुढील काळात आघाडी सरकारमधील मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com