शरद पवार हिंदूंचा अपमान करत असताना उध्दव ठाकरेंनी मूग गिळले
राजकीय

शरद पवार हिंदूंचा अपमान करत असताना उध्दव ठाकरेंनी मूग गिळले

विनायक मेटे यांची महाविकास आघाडीवर टिका

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

अयोध्येत राम मंदिर बांधल्यावर करोना जाणार का? या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवत राम मंदिर उभारले नाही तर करोना देशातून जाईल का? याचे उत्तर त्यांनी द्यावे असा प्रतिप्रश्न शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी विचारला.

पवार यांनी देशातील लाखो हिंदुच्या श्रध्देचा अपमान केला असून हिंदु हद्य सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मूग गिळून बसल्याचा घणाघात मेटे यांनी केला.

दुध दर आंदोलनावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर टिकास्त्र सोडले. बाळासाहेब यांनी त्यांचे सर्व आयुष्य हिंदुंच्या रक्षणासाठी वेचले. शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी महाविकास आघाडित सत्तेत अाहे.

बाळासाहेबांचे वारसदार राज्याचे मुख्यमंत्री असून राष्ट्रवादीकडून हिंदू धर्मावर टिका टिपण्णी केली जात आहे. असे असताना उध्दव ठाकरे हे मूग गिळून बसले आहे. त्यांनी हिंदू हदय सम्राट यांचे वारसदार म्हणून या मुद्यावर भुमिका स्पष्ट करावी असे आवाहन मेटे यांनी दिले.

राज्यात कोणी सुखी नाही

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या सत्तेत शेतकरी, धनगर, दूध उत्पादक सर्व दुखी असून राज्यात कोणीहि सुखी नाही अशी टिका मेटे यांनी केली. ग्राम पंचायतींवर भ्रष्टाचार करण्यासाठी राजकिय कार्यकर्त्यांची नेमणूक केली जात असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी लोकशाहिचा खुन केल्याची जहरी टिका त्यांनी केली.

Deshdoot
www.deshdoot.com