शिष्यवृत्ती उशीरामुळे प्रवेश रद्द होणार नाहीत
राजकीय

शिष्यवृत्ती उशीरामुळे प्रवेश रद्द होणार नाहीत

मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

करोना संकटामुळे उदभवलेल्या परिस्थितीत राज्यातील विजाभज,विमाप्र,इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची 2019-20 या शैक्षणिक वर्षातील किंवा तत्पूर्वीची शैक्षणिक संस्थांना देय असलेली शिष्यवृत्ती शासनाकडून येणे बाकी आहे Scholarship delays या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व दाखले, प्रमाणपत्र, व आवश्यक दस्तावेज त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे असे आदेश मंत्री विजय वडेट्टीवार यांनी Vijay Wadettiwar मॅट्रीकोत्तर शिक्षण देणार्‍या सर्व शैक्षणिक संस्थाना देण्यात आले आहे.

मंत्री वडेट्टीवार यांनी याबाबतचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करावे असे सूचना संबंधित विभागाला दिले होते. त्यानुसार इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मार्च महिन्यापासून राज्यात करोनाविषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यातील उद्योगधंदे तसेच राज्याच्या महसूलात भर टाकणारे उत्पनाचे स्रोत ठप्प झाल्यामुळे राज्याच्या महसूलात कमालीची घट झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर विजाभज,विमाप्र,इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्याची 2019-20 या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक संस्थाना देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करणे शासनाला शक्य झाले नाही.

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शासनाकडून मिळाली नसल्याच्या सबबीखाली काही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करत आहे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्था सोडल्याचा दाखला देण्याचे नाकारत आहे ही बाब मंत्री वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आली तेव्हा तातडीने त्यांनी शिष्यवृत्ती अप्राप्त असल्याच्या कारणाखाली विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द न करण्याचे आदेश मॅट्रीकोत्तर शिक्षण देणार्‍या सर्व शैक्षणिक संस्थाना दिले आहेत. याबाबत आज इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com