Rahul Narvekar : मुख्यमंत्र्यांनंतर विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा रद्द, ठाकरे गटाची चाल यशस्वी?

Rahul Narvekar : मुख्यमंत्र्यांनंतर विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा रद्द, ठाकरे गटाची चाल यशस्वी?

मुंबई | Mumbai

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा नियोजित परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. घाना या देशात पार पडणाऱ्या 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस लावणार राहुल नार्वेकर हजेरी लावणार होते. पण आता अचानक हा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात आलंय. हा दौरा रद्द होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray) सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अफिडेव्हिटनंतर नार्वेकरांनी हा दौरा रद्द केल्याची चर्चा आहे.

Rahul Narvekar : मुख्यमंत्र्यांनंतर विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा रद्द, ठाकरे गटाची चाल यशस्वी?
Gautami Patil : गौतमी पाटीलवर नगरमध्ये गुन्हा दाखल; काय आहे कारण?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या काळात आफ्रिकेतील घाना या देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. पण याच दरम्यान, म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेसंबंधित सुनावणी होणार होती.

आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाणूनबुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली आहे. राहुल नार्वकरांच्या भूमिकेवर ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर आता राहुल नार्वेकरांनी आपला परदेश दौरा रद्द केला की काय अशी चर्चा सुरू आहे.

राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लंडन-जर्मनी दौरा रद्द करण्यात आला आहे. ठाकरे गट सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाल्यामुळेच हे दौरे रद्द होत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटमुळे मुख्यमंत्र्यांचा लंडन-जर्मनी दौरा रद्द झाला तर ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रामुळे विधानसभा अध्यक्षांचा घाना दौरा रद्द झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com