VIDEO : पोलीस अधिकाऱ्यांसह जयंत पाटलांकडून माझ्या हत्येचा कट; पडळकरांचा गंभीर आरोप

VIDEO : पोलीस अधिकाऱ्यांसह जयंत पाटलांकडून माझ्या हत्येचा कट; पडळकरांचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

भाजपाचे (bjp) विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नोव्हेंबर महिन्यात आटपाडीत झालेली शिवसेना-राष्ट्रवादीच्या (shivsena-ncp) कार्यकर्त्यांकडून झालेला हा हल्ला सुनियोजित कट होता असा दावाही पडळकर यांनी केला आहे.

VIDEO : पोलीस अधिकाऱ्यांसह जयंत पाटलांकडून माझ्या हत्येचा कट; पडळकरांचा गंभीर आरोप
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

पडळकर यांनी एका व्हिडीओतून (video) माझ्यावर हल्ला करण्यामध्ये जयंत पाटील यांचा सहभाग होता असा आरोप केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी तो व्हिडीओ ७ नोव्हेंबर रोजीचा असल्याचा दावा केला आहे. आटपाडी पोलीस स्टेशनच्या (aatpati police station) जवळून जात असताना माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. हा हल्ला सुनियोजित होता, माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने २०० ते ३०० लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

VIDEO : पोलीस अधिकाऱ्यांसह जयंत पाटलांकडून माझ्या हत्येचा कट; पडळकरांचा गंभीर आरोप
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

पडळकरांनी आरोप करताना म्हटलं की, हल्ल्याच्या कटात जिल्ह्याचे एस.पी दिक्षित कुमार गेडाम, ॲडीशनल एस.पी मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील पुर्णपणे सामिल आहेत. यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच संस्पेंड केलं आणि उलट माझ्यावरच ३०७ अंतर्गत गुन्हा दाखलं केला.

तसेच, माझी गाडी ज्या दिशेने येत होती. त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडं फेकायची मग माझ्या गाडीची स्पीड कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा. आणि मग जमावाकडनं हमला करवून घ्यायचा असा सुनियोजित हा कट आखला होता. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण करताना पाहायला मिळतात. हा सगळा कट पोलीसांच्या संरक्षणात घडवून आणला जातोय आणि सदर घटना थांबविण्यापेक्षा चित्रिकरणात मग्न असल्याचंही पडळकर म्हणाले.

VIDEO : पोलीस अधिकाऱ्यांसह जयंत पाटलांकडून माझ्या हत्येचा कट; पडळकरांचा गंभीर आरोप
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

त्याचबरोबर पडळकर यांनी आता बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रक्षकच जर भक्षकात सामील असतील तर त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा असे म्हणत त्यांनी सांगली पोलीस अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

VIDEO : पोलीस अधिकाऱ्यांसह जयंत पाटलांकडून माझ्या हत्येचा कट; पडळकरांचा गंभीर आरोप
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com