Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याउपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक; NDA चे जगदीप धनखड विरुद्ध UPA च्या मार्गारेट अल्वा...

उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक; NDA चे जगदीप धनखड विरुद्ध UPA च्या मार्गारेट अल्वा यांच्यात सामना

दिल्ली | Delhi

देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक (Vice President Election) होणार आहे. निवडणुकीचे निकालही आजच सायंकाळपर्यंत जाहीर होतील. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे (NDA) उमेदवार माजी राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) आहेत. त्याचवेळी विरोधकांनी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

आकडेवारीचा विचार करता पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल धनखड यांचा विजय निश्चित दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने अल्वा यांच्या नावाच्या घोषणेपूर्वी एकमताचे प्रयत्न झाले नाहीत, असा दावा करून मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याची घोषणा केल्याने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून विरोधी पक्षांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत.

दरम्यान आम आदमी पार्टी (AAP), टीआरएस, AIMIM आणि JMM या पक्षांनी मार्गारेट अल्वा यांना पाठींबा देणयाची घोषणा केली आहे. बीएसपी आणि टीडीपी यांनी धनकड यांना पाठिंबा दर्शवला आहे. वायएसआरसीपी आणि बीजेडी या पक्षांनी अल्वा यांना पाठिंबा दर्शवला आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यसभेचे 233 निवडून आलेले खासदार, राज्यसभेचे 12 नामनिर्देशित खासदार आणि लोकसभेचे 543 खासदार मतदान करू शकतात. असे एकूण 788 लोक मतदान करू शकतात. जम्मू-काश्मीर विधानसभा विसर्जित झाल्यामुळे सध्या राज्यसभेत जम्मू-काश्मीरच्या कोट्यातील चार जागा रिक्त आहेत. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे एक जागा रिक्त आहे. अशा प्रकारे निवडून आलेल्या सदस्यांची सध्याची संख्या केवळ 228 आहे. त्याचवेळी नामनिर्देशित खासदारांच्या तीन जागाही रिक्त आहेत. त्यामुळे एकूण सदस्यांची संख्या सध्या 780 आहे.

मतदान कसे होते?

घटनेच्या अनुच्छेद 66 मध्ये उपराष्ट्रपती निवडीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. ही निवडणूक आनुपातिक प्रातिनिधिक पद्धतीने केली जाते. एकल हस्तांतरणीय मतदान प्रणालीद्वारे मतदान केले जाते. सोप्या शब्दात सांगायचे तर या निवडणुकीतील मतदाराला पसंतीक्रमाच्या आधारे मतदान करायचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या