दिग्गज फलंदाज व योगी सरकारमधील मंत्री चेतन चौहान यांचे निधन
राजकीय

दिग्गज फलंदाज व योगी सरकारमधील मंत्री चेतन चौहान यांचे निधन

गेल्या महिन्यात चेतन चौहान यांचा करोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता.

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

भारताचे माजी दिग्गज फलंदाज आणि कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे करोनामुळे निधन झाले आहे. काल संध्याकाळी चेतन यांना लखनऊ येथील पीजीआयमधून मेदांता गुरूग्राममध्ये आणण्यात आले होते. डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत होती. तब्बेत खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

गेल्या महिन्यात चेतन चौहान यांचा करोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. किडनीमध्ये करोनाचे विषाणू गेल्यामुळे शनिवारी त्यांची तब्बेत अचानक बिघडली. भारतीय संघाचे फलंदाज असलेले चेतन चौहान अमरोहा जिल्ह्यातील नौगांवा विधानसभेतील आमदार होते. चौहान यांच्याकडे उत्तर प्रदेश सरकारचे सैनिक कल्याण, होमगार्ड, पीआरडी आणि नागरिक सुरक्षा मंत्रालय होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com