राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई | Mumbai

आज मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant more) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी वसंत मोरेंनी भेट घेतली....

राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याबाबत केलेल्या व्यक्तव्यावर वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर मोरे यांनी त्यांना सर्वच पक्षांमधून ऑफर आल्याचे म्हंटले होते. आज राज ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, आजच्या भेटीनंतर माझ्या ज्या काही शंका होत्या त्या सर्व दूर झालेल्या आहेत. ठाण्यात (Thane) १२ एप्रिलला होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरेंनी मला बोलावले आहे. ही सभा उत्तरसभा आहे. ठाण्याच्या सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील. त्यामुळे तू ठाण्याच्या सभेला ये, असे मला राज ठाकरेंनी सांगितले.

आजच्या भेटीनंतर मी १०० टक्के मनसेतच आहे आणि मनसेतच राहणार असल्याचेही देखील त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.