Saturday, April 27, 2024
Homeराजकीयआगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार- पिचड

आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार- पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत एकदिलाने काम करणार असून भाजप स्वबळावर निवडणूक लढणार आहे, अशी माहिती माजी आ. वैभवराव पिचड यांनी दिली.

- Advertisement -

माजी आ. पिचड यांनी काल भाजप पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, हितेश कुंभार, राहुल देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार पिचड म्हणाले की, भाजपची अकोले तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवतील. करोना व इतर सर्व बाबींचा विचार करण्यास वेळ लागला म्हणून या कार्यकारणीची निवड करण्यास उशीर झाला असल्याचे त्यांनी म्हटले.

मोदी सरकारची ही दुसरी टर्म असून त्यांनी शेतकर्‍यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. करोनाच्या काळात राज्य सरकारने तालुक्यासाठी काहीही मदत केली नाही. ग्रामपंचायतीचा विकास कामांचा निधी राज्य शासनाने परत घेतला. वास्तविक पाहता लोकप्रतिनिधींनी या कामी पुढाकार घेणे अपेक्षित होते.

मात्र तसे न करता त्यामध्ये राजकारण आणून खोडा घातला. नगरपंचायतने करोनाच्या काळात अतिशय चांगले काम केले, तर अगस्ति कारखान्याने कोव्हिड सेंटर उभारून औषधेही उपलब्ध करून दिली. मात्र लोकप्रतिनिधी व शासन तालुक्यासाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी कमी पडले आहे.

तालुक्यातील सर्व संस्था ह्या चांगले काम करीत असून यापुढेही अतिशय जोमाने काम चालू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात अजून आमच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही, तसा कोणी संपर्क साधल्यास त्यावर नंतर विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल, असेही पिचड यांनी सांगितले.

उद्या रविवार दि.6 डिसेंबर रोजी पंडित दीनदयाळ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर अकोले येथे आयोजित करण्यात आले असल्याचे माजी आमदार पिचड यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या