Thursday, April 25, 2024
Homeराजकीयखालच्या पातळीचे राजकारण केले नाही, आणि करणारही नाही - वैभव पिचड

खालच्या पातळीचे राजकारण केले नाही, आणि करणारही नाही – वैभव पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

करोनाचं संकट इतकं मोठं असताना इतर विषयांवर चर्चा करून राजकारण करण्याची ही वेळ नाही हा विचार मनात बाळगून मी काम करतोय,

- Advertisement -

खडकी याठिकाणी जे प्रकरण घडलंय त्याचा तपास पोलीस यंत्रणा करतेय व या प्रकरणात कुठलाही हस्तक्षेप माझ्याकडून किंवा माझ्या कार्यकर्त्यांकडून झालेला नाही व होणारही नाही. कारण इतक्या खालच्या पातळीचे राजकारण आजपर्यंत केलेलं नाही व भविष्यातही करणार नाही हे तालुक्याला माहीत आहे, असे मत माजी आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात माजी आमदार पिचड म्हणाले, खर्‍या अर्थाने राजकारण हे जनतेला सोबत घेऊन जनतेसाठी करायचं असतं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीने समजून घेतलं पाहिजे. तेव्हा सर्व नागरिकांना आवाहन करतो की तालुक्यासमोर सध्या करोनाच्या काळात असंख्य संकटे आहेत त्याबाबत आपण बोला, शासनाने निधी देण्याचं बंद केलेलं आहे.

त्यामुळे विकासकामे रखडली आहेत तसेच आरोग्यव्यस्थेवर कुठलंही काम करायला सरकार तयार नाही. याठिकाणी टेस्ट किट उपलब्ध नाही, डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांची कमी आहेत, व्हेंटिलेटर नाही व साहित्याचाही मोठा तुटवडा आहे. येणार्‍या काळात मोठ्या संकटांचा सामना याठिकाणी आपल्याला करायला लागू शकतो म्हणून आपण स्वतःची व परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या