Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयनिवडणुकीत जय पराजय होत असतात - वहाडणे

निवडणुकीत जय पराजय होत असतात – वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

विधानसभेला 1300 मते ही नगराध्यक्षांना जनतेने दिलेली त्यांच्या अपयशाची पावती आहे. तरीही त्यांनी नैतिकता स्विकारली नाही.

- Advertisement -

अशा वेळी त्यांच्याकडून तो निर्णय होणे अपेक्षित होते अशी टिप्पणी करून औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत पराभव होतच असतात, आमचा झाला तसा साहेबांचा, दादांचा आणि ताईंचा ही झाला आहे, निवडणुकीत जय पराजय होत असतात असा पलटवार नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला.

विवेक कोल्हे यांनी चार वर्षांमधील कामगिरी मांडत वहाडणेंच्या पालिका कारभारावर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. मग 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील तुमचे तीस हजारांचे मताधिक्य कुठे गेले? असा सवाल करून पालिका वाचावी म्हणूनच जनतेने मला नगराध्यक्ष ठेवले असल्याचे सांगून वहाडणे म्हणाले, 10 वर्षात झाली नाहीत इतकी कामे मी साडेतीन वर्षात केली. प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व जनतेला ही कामे माहिती आहेत. तुम्ही नगरपरिषदेला निधी मिळू दिला नाही, कारभारात अडथळे आणले, 5 नंबर साठवण तलाव व्हावा म्हणून मी दिल्लीपासून प्रयत्न करत होतो. पण तुम्ही अडथळेच आणले. कोपरगावचे हक्काचे क्रीडासंकुल नेले. आता क्रीडांगणासाठीची राखीव जागा घ्यायचा प्रयत्न का केला नाही. हे मला विचारता. माझ्याविरुद्ध बातम्या पेरायच्या उद्योग बंद करा असे प्रत्युत्तर वहाडणे यांनी कोल्हे यांना दिलं आहे.

सर्वसाधारण सभा किती झाल्या याचा हिशोब ठेवण्यापेक्षा शहरात झालेल्या विकासकामांचा हिशोब करा. शहरातील हेम मेडिकल ते एस. जी. विद्यालय रस्ता, धारणगाव रस्ता, गुरुद्वारा रोड, संभाजी महाराज चौक ते इंदिरा पथ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा, खोका शॉप कामे लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत. डॉ. आंबेडकर मैदानाचे व अनेक रस्त्याच्या कामाचे कार्यादेश दिलेले आहेत.

कोपरगाव नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर वेस्ट झोन मध्ये 18 वा नंबर आला हे दिसत नाही का. तुमच्या काळात साठवण तलावातील माशाचा ठेका, ज्येष्ठ नेते श्री.कोल्हे साहेबांचे मार्गदर्शन सल्ला घेतला तर फार बरे होईल. आम्ही खोका शॉपसाठी काय प्रयत्न करतोय याची माहिती घ्या. सर्व प्रभागांत झालेली कामे जाऊन बघा, मग कळेल किती कामे झालेली आहेत. गेल्या चार वर्षात केलेली कामे त्यांनी मांडली आहेत. आपण नगरपालिका अत्यंत व्यवस्थित हाताळल्याचा दावा नगराध्यक्ष वहाडणे यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या